आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peoples Republic Party Open Its Door To The Congress

पीपल्स रिपब्लिकन पार्टीने कॉँग्रेसला ‘कवाडे’ उघडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी काँग्रेससोबत जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी ‘दिव्य मराठी’ला दिली.


प्रा. कवाडे म्हणाले की, भारिप, रिपाइं आणि पीआरपी या गटांना राज्यातून ब-यापैकी जनाधार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने स्थापन केलेली महाराष्‍ट्र लोकशाही आघाडी या वेळी स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. तसेच रिपाइंचे रामदास आठवले शिवसेना-भाजपच्या तंबूत आहेत. त्यामुळे आम्हाला सोबत घेण्यास काँग्रेसला विशेष अडचण नसावी. काँग्रेसशी याबाबत लवकरच चर्चा होईल, परंतु त्यात यश नाही आले तर आम्ही स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. लोकसभेच्या पाच आणि विधानसभेच्या 51 जागा ‘पीआरपी’ लढवणार असल्याची माहितीही प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली.


आठवले महायुतीत असल्यामुळे दलित मतांचे विभाजन होईल, हा शिवसेना-भाजपचा व्होरा चुकीचा आहे. दलित मतदार खास करून आंबेडकरांचे अनुयायी नेत्यांच्या तालावर कधीच मतदान करत नाहीत, हे आजपर्यंतच्या निवडणुकांनी सिद्ध झाले आहे, असे कवाडे म्हणाले.