आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपीस बहिणीच्या लग्नास जाण्‍याची परवानगी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मे 2006 मधील वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील एका आरोपीला बहिणीच्या विवाहासाठी विशेष मोक्का न्यायालयाने चार दिवस औरंगाबादेत येण्याची परवानगी न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी दिली आहे.


मोहंमाद मुझफ्फर मोहंमद तन्वीर असे आरोपीचे नाव असून सध्या तो वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात मुंबईतील तुरुंगात अटकेत आहे. तन्वीरच्या बहिणीचा काही दिवसांपूर्वी विवाह ठरला आहे. सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी त्याने मोक्का न्यायालयात याचिका दाखल केली होती.


सोमवारी मोडक यांनी सुनावणी देताना तन्वीरला बहिणीच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी 25 ते 28 एप्रिलदरम्यान परवानगी दिली. त्याच्यासोबत चार दिवस सहा पोलिस असतील. सर्व पोलिसांच्या 12 तासांच्या शिफ्टसाठी खर्चापोटी तन्वीरला 54 हजार रुपये भरावे लागणार आहेत. मात्र, या वेळी तुरुंग प्रशासनाने 24 तासांच्या मानधनापोटी 1 लाख 84 हजार रुपयांची मागणी केली. त्यावर न्यायालयाने 54 हजार अंतिम रक्कम ठरवली. जमाते-उलेमा-ए-महाराष्‍ट्र या स्वयंसेवी संस्थेने तन्वीरला कायदेशीर सल्ल्यासाठी मोफत मदत देऊ केली आहे.
तुरुंगातच झोपावे लागणार : दिवसभराचे सर्व समारंभ आटोपल्यानंतर तन्वीर याला औरंगाबादच्या कारागृहात झोपण्यासाठी जावे लागणार आहे. चार दिवसांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार करणार नाही, अशी हमी द्यावी लागणार आहे.