आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंच्या उपस्थितीत परशुराम उपरकरांचा मनसेत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/खेड- नाशिकमध्ये सुनील बागुल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता कोकणातही शिवसेनेला खिंडार पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेत प्रवेश केला. खेड येथे होणार्‍या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उपरकर यांनी पक्षप्रवेश केला.


राज ठाकरे महाराष्ट्र दौर्‍यावर असून ते सध्या कोकणात आहेत. उपरकर यांनी राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी भेट घेऊन चर्चा केली होती. उपरकर यांना शिवसेनेतर्फे पुन्हा उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. 29 डिसेंबर रोजी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाराजीही व्यक्त केली होती. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा अखेर निर्णय घेतला.

उपरकर यांनी मनसेत प्रवेश करण्याचा यापूर्वीही प्रयत्न केला होता. परंतु राज ठाकरे यांनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. शिवसेनेचे नाशिकमधील महानगरप्रमुख सुनील बागुल यांनीही शिवसेनेला काही दिवसांपूर्वीच जय महाराष्ट्र केला होता. उपरकर यांचे सर्मथक शैलेश भोगले आणि जयसिंग नाईक या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनीही आपले राजीनामे दिले आहेत. परशुराम उपरकर यांनी आपल्या सर्मथकांसह मनसेत प्रवेश केल्याने कोकणात मनसेची ताकद वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.