आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशके, बीटीचे को-मार्केटिंग बंद करावे; नमुने अप्रमाणित कंपन्या काळ्या यादीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कीटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे परराज्यात उत्पादन करून महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांच्या नावाने विक्री करण्यासाठी (को-मार्केटिंग) परवाना न देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी घेतला. कुठल्याही परिस्थितीत किडीचा प्रकोप आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या स्तरापर्यंत जाणार नाही याची दक्षता विभागस्तरावर  घ्यावी. गुणवत्ता नियंत्रणासाठी विक्री परवाना देण्याचा अधिकार आता स्थानिक स्तरावरील यंत्रणांकडे न देता राज्यस्तरीय यंत्रणेला देऊन संनियंत्रण करण्याबाबतचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण कामाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह या वेळी उपस्थित होते. राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षातील कीटकनाशकांचे नमुने तपासणी, अप्रमाणित नमुन्यासंदर्भात करण्यात आलेली कारवाई याचा आढावा घेतला.

जिल्हास्तरावर गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचे  निर्देश कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले.अनेक कंपन्या परराज्यातून माल आणून स्वत:च्या ब्रँडनेमने विकतात. त्यामुळे कारवाई करताना संबंधित कंपनीवर कायदेशीर अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारचे को-मार्केटिंग करण्याचा परवाना देण्यात येऊ नये,असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात बियाण्यांवर कीड प्रकोप आर्थिक दृष्ट्या न परवडणाऱ्या स्तरापर्यंत (ईटीएल) जाणार नाही यासाठी क्षेत्रीयस्तरावर कृषी विभागाच्या ‘स्काऊट’च्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येईल. कीटकनाशके आणि बियाणे गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही आता स्थानिक ऐवजी राज्यस्तरीय यंत्रणेकडून करण्यात यावी. राज्यात एकच कंपनीचे बी टी बियाणे वेगवेगळ्या ब्रँडनेमने विक्री होते त्यावर प्रतिबंध घालावा, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले. 
बातम्या आणखी आहेत...