आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार, राजविरोधातील याचिका मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी व मनसे कार्यकर्त्यांमध्ये फेब्रुवारीत झालेल्या हाणामा-यांमुळे राज्यातील सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस जबाबदार धरत उपमुख्यमंत्री अजित पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्याची मागणी करणारी याचिका मागे घेण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. न्या. पी. व्ही. हरदास व न्या. रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेतील तांत्रिक त्रुटींकडे बोट दाखवत न्यायालयाने पाटील यांना नव्याने याचिका दाखल करण्याची देखील परवानगी दिली.


फेब्रुवारीमध्ये पवार व ठाकरे यांनी एकमेकांविरोधात जहाल शब्दांत टीका केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या प्रकाराला दोन्हीही नेते जबाबदार असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.