मुंबई- पीटर आणि इंद्राणी मुखर्जी या दांपत्याचे इंद्राणीचा आधीचा पती संजीव खन्ना याच्यासोबत व्यावसायीक संबध असल्याचे उघडकीस आले आहे. पश्चिम बंगालमध्ये व्यावसायीक धार्मिक पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मुखर्जी दांपत्याने खन्ना याच्यासोबत जानेवारी 2015 मध्ये एक करार केला होता. यासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी प्रेझेंटेशनही ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे यासाठी छापण्यात आलेल्या माहिती पुस्तकांवर शिना बोराचा बालपणाचा फोटो छापण्यात आला होता. शिना 'लकी मॅस्कॉट' असल्याचे यात सांगण्यात आले होते.
कोलकत्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या बावली या गावामध्ये हे प्रस्तावित व्यावसायीक धार्मिक पर्यटन केंद्र उभारण्यात येणार होते. त्यासाठी मुखर्जी दांपत्य आणि संजीव यांनी या गावाला भेट दिली होती.
बावली या गावातील राजबारी मॅंशनला फाईव्हस्टार हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्यासाठी संजीव आणि त्याचा व्यावसायिक भागीदार अमित राओला यांनी काम सुरु केले होते. 12 जानेवारी रोजी पीटर, इंद्राणी आणि संजीव यांनी राजबारीमध्ये एक प्रेझेंटेशन ठेवलो होते. त्यासाठी स्थानिकांना बोलविण्यात आले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत परिसरातील 12 मंदिरांची पूर्नबांधणी करण्यात येणार होती.
यावेळी ग्रामस्थांना संबंधित प्रकल्पाची माहिती पुस्तके वाटण्यात आली. या 12 पानी पुस्तकांच्या मुखपृष्ठावर शिनाचा बालपणाचा फोटो छापण्यात आला होता. ही मुलगी आमच्यासाठी 'लकी मॅस्कॉट' असल्याचे यात सांगण्यात आले होते. त्याखाली आपली भविष्यातील पिढी असे लिहिले होते.
या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मंदिरांचा ताबा आमच्याकडे द्या. त्यानंतर आम्ही गावांमध्ये गुंतवणूक करु, अशी अट घातल्याने मुखर्जी दांपत्यासोबत गावकऱ्यांचे एकमत झाले नाही.
पुढील स्लाईडवर बघा, इंद्राणीला असे पोलिस संरक्षणात नेण्यात आले होते खार पोलिस स्टेशनमध्ये...