आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peter Mukerjee Sought To Change Insurance Nominees In September

शीना बोरा हत्‍याकांड :पीटर मुखर्जी यांच्‍या कोठडीत तीन दिवसांची वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हाय प्रोफाइल शीना बोरा हत्‍याकांडाला रोज नवे वळण मिळत आहे. त्‍यामुळे गुढ वाढत आहे. या प्रकरणात सीबीआयने स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना अटक केली. पीटर यांनी आपल्‍या विम्‍यावरील वारसदाराचे नाव बदलण्‍याचा प्रयत्‍न केला होता, असे वृत्‍त काही प्रसार माध्‍यमांनी दिले. दरम्‍यान, पीटर यांना सोमवारी सीबीआयच्‍या न्‍यायालयात हजर केले केले गेले. न्‍यायालयाने त्‍यांच्‍या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे. या प्रकरणात सीबीआयने 43 हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. त्‍यानंतर काहीच तासांत पीटर यांना गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक करून भा.दं.वि कलम 302, 120 ब, 206, 201 आणि 364 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

इंद्राणीसोबत संबंध तोडणार होते

इंद्राणीला अटक झाल्‍यानंतर पीटर हे तिच्‍यासोबतचे संबंध तोडणार होते. एवढेच नाही तर सप्‍टेंबरमध्‍ये त्‍यांनी आपल्‍या उच्च मूल्य विमा पॉलिसीचे वारसदार म्‍हणून मुलगा राहुल आणि रॉबिन मुखर्जी यांचे नाव टाकण्‍याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यांनी वर्ष 2003 मध्‍ये कोलकत्‍ता येथे या पॉलिसीज घेतल्‍या असून, नॉमिनी म्‍हणून इंद्राणी आणि तिची मुलगी विधी यांचे नाव आहे. पीटर यांनी विधीला दत्‍तक घेतलेले आहे.
पुढील स्लाइड्सवरील ग्राफिक्सवर वाचा, उनुत्‍तरित प्रश्‍न...