आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिल अंबानी यांची RCom कंपनी दिवाळखोरीत, चिनी बॅंकेने दाखल केली याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकडे बंधू अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन अडचणीत सापडली आहे. चीनमधील चायना डेव्हलपमेंट बॅंकेने (सीडीबी) अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये (एनसीएलटी) दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे.

 

आरकॉमचे शेअर घसरले...

सीडीबीने 24 नोव्हेंबरला अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.  या वृत्तामुळे रिलायन्स कम्यूनिकेशनचे शेअर 3.37 टक्क्यांपर्यंत पडले आहेत. दरम्यान, अशाप्रकारची कोणतीच नोटीस कंपनीला मिळाली नसल्याचे रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

 

थकवले 1.78 अब्ज डॉलरचे कर्ज...
आरकॉमने 2011 मध्ये सीडीबीकडून 1.78 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. पण कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यामुळे आरकॉम विरोधात एनसीएलटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी सिंडीकेट ऑफ चायनीज बॅंक आणि अन्य संस्थांनी आरकॉमला 10  वर्षांसाठी दिले होते.

 

दरम्यान, 31 मार्चपर्यंत आरकॉमवर एकूण 44345 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

 

आरकॉम स्पेक्ट्रम खरेदी करण्‍याची जिओची इच्छा...
'द इकोनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार आरकॉमचे 850 मेगाहट्र्ज बॅंडचे 4जी स्पेक्ट्रम खरेदी करण्‍याची रिलायन्स जिओने इच्छा दर्शवली आहे. रिलायन्स जिओने दिल्ली, कोलकाता, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, यूपी-पश्चिम आणि पश्चिम बंगालमधील सिस्टेमा श्यामचे स्पेक्ट्रम खरेदी करण्याच्या तयारी आहे. त्याची मूदत 2033 पर्यंत आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... आरकॉमविरोधात या कंपन्यांनीही दाखल केल्या आहेत याचिका...

बातम्या आणखी आहेत...