आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंप्रधान मोदींविरोधात उच्च न्यायालयात याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतातील अणुशास्त्रज्ञांच्या गूढ मृत्यूबाबत चौकशी व्हावी, यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत अणुऊर्जा विभाग व अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवल, आयबी प्रमुख सय्यद असिफ इब्राहिम, ह्यरॉह्णचे संचालक राजिंदर खन्ना आणि सीबीआयचे संचालक अनिल कुमार सिन्हा यांनाही प्रतिवादी केले. न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे.