आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तला शिक्षेमध्ये सवलत देण्यात येऊ नये; मुंबई हायकोर्टात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व अभिनेता संजय दत्त याला शिक्षेत सूट देऊ नये, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल झाली.

प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. अलीकडेच सरकारने संजयची १८ महिन्यांची शिक्षा माफ केल्याचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झालेले आहे. या पार्श्वभूमीवर भालेकर यांनी याचिकेत म्हटले की, ‘सरकार केवळ त्याच्यावरच मेहरबानी दाखवत आहे. असे असेलत र संजयप्रमाणेच राज्यातील २७ हजार ७४० कैदीही अशा सुटकेसाठी पात्र आहेत. मात्र संजयसाठी पुण्याच्या येरवडा तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लॉबिंग केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

गृह विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार संजय २७ फेब्रुवारी रोजी तुरुंगातून बाहेर पडू शकतो. दरम्यान, तुरुंगातील त्याची वर्तणूक चांगली असल्याचे कारण देऊन त्याची १८ महिन्यांची शिक्षा कमी करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...