आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हवाईजादा\' चित्रपट वादाच्या भोव-यात, प्रदर्शनास स्थगितीची वैदिक संशोधकांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबई- अमेरिकेतील राइट बंधूंच्या अगोदर विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल मराठी संशोधक शिवकर बापूजी तळपदे यांना श्रेय दिले जाते. मुंबईच्या या अवलिया संशोधकावर बेतलेल्या ‘हवाईजादा’ चित्रपटातील दृश्यांवर वैदिक संशोधकांनी आक्षेप घेतला असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शुक्रवारी प्रदर्शित होणारा हा चित्रपट वादात सापडला आहे.
रिलायन्स एंन्टरटेनमेंट निर्मित ‘हवाईजादा’ चित्रपट मराठी संशोधकाची भन्नाट जीवनकहाणी आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षक असलेल्या शिवकर तळपदे यांनी मुंबईच्या चौपाटीवर मानवविरहित िवमान उड्डाणाचा प्रयोग 1887 मध्ये केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अमेरिकेतील राइट बंधूंच्या (1903) नावे असणारे िवमान उड्डाण शोधाचे श्रेय तळपदेंना द्यायला हवे, असे काहींचे म्हणणे आहे. या प्रयोगावर हवाईजादा पूर्ण झाला. मात्र,प्रदर्शनापूर्वी चार वैदिक संशोधकांनी त्यावर अाक्षेप घेतला. पटकथेत चुकीच्या गोष्टीमुळे संस्कृतपंडित तळपदे यांचे चारित्र्यहनन होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आली आहे.
1. मुंबई विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेत वेदामध्ये व‍िमान उडविण्याचे विज्ञान असल्याचा शेाधनिबंध कॅप्टन आनंद बोडस यांनी सादर केला होता. तो शोधनिबंध मोठ्या वादाचा विषय झाला होता.

2.अजित तळपदे (मुंबई), वीरेंद्र आगरवाल (ठाणे), हृषीकेश िखलारे (बीड) आणि रोहित अपूर्व (परभणी) या चार वैदिक संशोधकांनी हवाईजादा चित्रपटावर बंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

3. अंशुमन खुराणा, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी सारडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हवाईजादा या हिंदी चित्रपटाचे विभू पुरी दिग्दर्शक आहेत.
4. काही दृश्य वगळण्याबाबत निर्माता, दिग्दर्शकांना नोटीस बजावली होती. पण त्याच्या प्रतिसादा अभावी प्रदशर्नाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली असून २९ रोजी सुनावणी असल्याचे वादीचे वकील अॅड. पंकज पांडे यांनी 'दिव्य मराठी’ला सांगितले.
वादाचा मुद्दा असा
शिवकर तळपदे संस्कृतपंडित आणि वेदाभिमानी होते. त्यांना या चित्रपटात मद्य पिणारे तसेच डान्स बार गर्ल सोबत अनैतिक संबंध ठेवणारे दाखवलेले आहे. त्यामुळे एका थोर संशोधकाचे चारित्र्यहनन होत असल्याचे या चार वैदिक संशोधकांचे म्हणणे आहे.