आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन: साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करावी, हेमंत पाटील यांची याचिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाॅलीवूड अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात गुरुवारी दाखल झाली. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. २००२ च्या हिट अँड रन प्रकरणात एका पादचार्‍याचा मृत्यू झाला हाेता तर अन्य चाैघे जखमी झाले हाेते. सलमान खानचा अंगरक्षक रवींद्र पाटील हे मुख्य साक्षीदार होते.

पाटील यांनी सलमानविरोधात न्यायालयात साक्षही दिली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सलमानने पाटील यांच्यावर दबाव आणला. त्यामुळेच नैराश्यातून त्यांचा मृत्यू झाला. एकूणच हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने पाटील यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे. २००२ मध्ये सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षाांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, सलमानकडून शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची सशर्त जामिनावर सुटका केली.

रविंद्र पाटीलचा मृत्यू क्षयरोगानेच
सलमानविरोधात साक्ष दिल्यानंतर पाटील न्यायालयासमोर येण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट बजावले होते. याप्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांना नोकरी गमवावी लागली होती. पाटील यांचा शिवडीतील एका सरकारी रुग्णालयात क्षयरोगावरील उपचारादरम्यान ४ ऑक्टोबर २००७ साली मृत्यू झाला होता.