आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल राज्यात झाले स्वस्त, वाचा काय आहे फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केवळ महाराष्ट्रात पेट्रोलियम पदार्थांवर लागू असलेला स्टेट स्पेसिफिक अधिभार कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यामुळे शनिवारपासून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर किमान दीड ते दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे पेट्रोलियम विक्रेत्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव पोंिड्रक यांनी राज्य सरकारला ही अधिभार कपातीची माहिती कळवली. यासंबंधीचे परिपत्रक शुक्रवारी रात्री काढले जाईल, असेही त्यांनी राज्य सरकारला कळवले होते.

कच्चे तेल (क्रूड ऑइल) मुंबई बंदरातून मुंबई शहरात येते तेव्हा त्यावर मुंबई महापालिका ३ टक्के जकात आकारते. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या ही जकात भरतात. त्यानंतर यातील पेट्रोलियम पदार्थांपैकी ६० टक्के पदार्थ महाराष्ट्राबाहेरच जात असतात. मात्र या जकातीचा भुर्दंड केवळ महाराष्ट्रातील जनतेवर गेली अनेक वर्षे लादला जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> स्पेसिफिक चार्ज केवळ महाराष्ट्रात
>> मे मध्येआणखी स्वस्त होणार