आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यात पेट्रोल दरात सातत्याने वाढ; 78 चा टप्पा पार, ग्राहक संघटना गप्पच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- इंधनांचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 60 दिवसातील 50 दिवसात इंधनाच्या किंमती वाढतच गेल्याचे निदर्शनास आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाल्यापासून वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हे कुणाच्याच लक्षात येत नसल्याने याबाबत कुठेही बोलले जात नाही. मुंबई आणि पुण्यात पेट्रोलने 78 चा टप्पा पार केला आहे.
 
दररोज दर ठरवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत पेट्रोलचे दर 6 रुपयांनी, तर डिझेलचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत. शहरांनुसार हा आकडा कमी-जास्त आहे. ग्राहकांच्या कोणत्याही संघटना याबाबत अजुनही बोललेल्या नाहीत.
 
मुंबईत आज (28 ऑगस्ट) पेट्रोलचे दर 78.22 रुपये एवढे, तर डिझेलचे दर 60.57 रुपये एवढे आहेत. मुंबईतही गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर कायम वाढतच गेल्याचे दिसून येते.  पैशा-पैशांनी होणारी ही वाढ पटकन कुणाच्या लक्षात येत नाही. 
 
दरांमध्ये रोज बदल
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वाच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी आणि दरातील चढ-उताराचा ग्राहकांना फटका बसू नये, हा यामागे उद्देश आहे. 1 जुलैपासून पेट्रोल-डझेलचे दररोज दर बदलण्यास सुरुवात झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...