आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपांवर मापात पाप : चीप बनविणाऱ्या मास्टरमाइंडला अटक, संपूर्ण रॅकेट होणार उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्य आरोपी प्रशांत (इन्सॅटमध्ये) याला हुबळी येथून अटक करण्यात आली आहे. - Divya Marathi
मुख्य आरोपी प्रशांत (इन्सॅटमध्ये) याला हुबळी येथून अटक करण्यात आली आहे.
मुंबई - चिपच्या माध्यमातून पेट्रोप पंपांवर पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या प्रशांत नूलकर याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी कर्नाटकच्या हुबळीतून अटक केली. गाडीत पेट्रोल टाकणारी मशीन बनवणाऱ्या कंपनीचा माजी कर्मचारी असलेला ५६ वर्षांचा नूलकर देशभरात पेट्रोल चोरी करणाऱ्या चिपचा पुरवठा करत होता. या कामातील त्याचा सहकारी विवेक शेट्येला मे महिन्यातच अटक करण्यात आलेली आहे. 
 
एका चीपद्वारे करण्यात येत होती चोरी
इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोल पंपावर फसवणूक होत असल्याचे सर्वप्रथम ठाणे आणि डोंबिवलीत उघड झाले होते. त्यानंतर औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. एका लिटरमागे जवळपास 20 मिली इंधन कमी दिले जात होते. मशीनवर योग्यच आकडा दिसत असल्याने ग्राहकांना संशय येत नव्हता पण त्यांची फसवणूक होत होती. 
 
नोकरी सोडून उघडली स्वत:ची कंपनी
- प्रशांत हा पेट्रोल पंपासाठी इलेक्ट्रॉनिक चीप बनविणाऱ्या कंपनीत कामाला होता. तिथेच त्याला चीप लावून पेट्रोल पंपावर चोरीची आयडिया सुचली. त्यानंतर त्याने नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु केली. 
 
अशा रितीने पोलिस पोहचले प्रशांतपर्यंत
- पेट्रोल-डिझेल चोरी प्रकरणात उत्तर प्रदेश एसटीएफने पिंपरीतील अविनाश नाईक आणि उल्हासनगरमधील विवेक शेट्टीला अटक केली होती. दोघांच्या चौकशीत प्रशांतचे नाव पुढे आले. ते दोघे प्रशांतच्या कंपनीत बनवलेली चीप आणि रिमोट देशभरात पोहचवत होते. 
- तत्पूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी अजय चौरसिया नावाच्या एका चीप बसविणाऱ्या व्यक्तीला पकडले होते. त्याने चौकशीत नाईक आणि शेट्टीचे नाव सांगितले होते. नाईकला अटक करण्यात आल्यानंतर त्याने प्रशांतचे नाव सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...