आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ‘नेतागिरी'चा अभ्यासक्रम, 9 महिन्यांच्या पीजी कोर्सची फी 2.5 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गल्लीपासून दिल्ली गाठण्याची नेतागिरी  आता वर्गात शिकवली जाईल. नेतागिरीचा देशातील बहुतेक पहिलाच पीजी कोर्स आहे. त्याचे नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएशन इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नंस. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित संस्थेने मुंबईच्या उत्तन येथील केंद्रात  सुरू केला आहे. पुढारी होण्यासाठी आलेेल्या पहिल्या बॅचमध्ये एकूण ३२ तरुणांनी प्रवेश घेतला आहे. यात एमबीएपासून  आयआयटीयन्सचाही समावेश आहे. ९ महिन्यांच्या या कोर्सचे शुल्क अडीच लाख रुपये आहे. 

संघाची संस्था रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ डेमोक्रॅटिक लीडरशिप (आईआईडीएल) मध्ये नेतागिरीच्या पहिल्या बॅचचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगण, प. बंगाल, मध्य प्रदेशच्या तरुणांचा समावेश आहे. प. बंगालचा अरित्र चट्टोपाध्याय एमबीए आहे. पुण्यात मॅकॅनिकल इंजिनिअर म्हणून त्याने काम केलेले आहे.  अरित्र आता पुढारी बनून ईशान्येकडील राज्यांच्या विकासात योगदान  देऊ इच्छितो.
 
हैदराबादचा प्रवीणचंद्र पिडीशेट्टी आपल्या आजोबांचा राजकीय वारसा पुढे चालवून नेता होऊ इच्छितो. त्याचे आजोबा व आईचे वडील एकेकाळी राजकारणात होते. नंतर कुटुंबातून कुणीच राजकारणात आले नाही. याचप्रमाणे डॉ. के. लक्ष्मण, यूपीचे शैलेंद्र जैस्वाल, एमपीचे अनुराग पांडेय आदीही नेतागिरीचा अभ्यास करत आहेत. बुधवारी आयआयडीएलमध्ये वर्गाचा पहिला दिवस होता. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष व भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ते म्हणाले, राजकारणात कुणीच मनुष्यबळ विकासाकडे लक्ष देत नाही. ही संस्था नेता घडवण्याचा कारखाना नाही. उलट राजकारणात चांगल्या लोकांना घडवण्याचा प्रयत्न आहे.
 
आमदार पतीकडून लॅम्बॉर्गिनी भेट मिळालेली सुमन एकमेव विद्यार्थीनी
मीरा-भायंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता या काेर्सला प्रवेश घेणाऱ्या एकमेव विद्यार्थीनी आहेत. सुमन मूळ वाराणसी येथील आहेत. त्यांच्या वाढदिवशी पतीने त्यांना चक्क साडेपाच कोटींची इम्पोर्टेड लॅम्बॉर्गिनी कार भेट दिली होती. मी हा अभ्यासक्रम करावा, अशी पतींची इच्छा नव्हती. मात्र, मी नेतागिरीसाठी नव्हे, प्रशासन विषयात पदवी मिळवण्यासाठी हा कोर्ट करत आहे, असे सुमन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...