आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत असा असतो गणेशोत्‍सवाचा जल्‍लोष, क्‍लिक करा हे 20 सुंदर फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्‍सव आज महाराष्‍ट्र किंवा भारतातच साजरा होत नाही. तर, जगात जेथे जेथे मराठी माणूस पोहोचला तेथे तो गणेशोत्‍सव साजरा करतो. परदेशात साजरा होणारा गणेशोत्‍सव तेथील भारतीय लोकांना संघटित करण्‍याचे काम करतो. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळाची माहिती देत आहोत. अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टीवरील कॅलिफोर्नियाला लागून असलेल्या अॅरिझोना या राज्यामध्ये हे मंडळ आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी या मंडळाने घरगुती स्वरूपात या मंडळाची स्‍थापना केली होती. तेव्‍हा सुमारे 12 जण मंडळाचे सदस्‍य होते; मात्र आज मोठ्या प्रमाणात विस्‍तार वाढला आहे.
- फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळाच्‍या वतीने सुरूवातीला गणपती व दिवाळी हे दोनच कार्यक्रम घेण्‍यात येत.
- आता वर्षां-सहल, मराठी चित्रपट, मराठी शाळा असे नवनवीन उपक्रमही साजरे केले जातात.
- आधुनिक पिढीचाही या सर्व उपक्रमांना उस्‍फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
- गणेशोत्‍सव हा मंडळाचा सर्वात मोठा उत्‍सव आहे.
- दरवर्षी 400 च्‍या जवळपास सदस्‍य या उत्‍सवात सहभागी होतात.
- गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या काळात येणाऱ्या शनिवारी किंवा रविवारी हा वार्षिक उत्सव असतो.
- भारतीय सणांना परदेशात सुट्या नसल्‍या तरी लोक सणांचा आनंद सुटीच्‍या दिवशी लुटतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अमेरिकेत असा असतो गणेशोत्‍सवाचा जल्‍लोष..
पुढे पाहा, मागील वर्षी भाविकांनी असेे तयार केले होते मातीचे गणपती..
बातम्या आणखी आहेत...