आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्‍या फोटोग्राफरने दाखवले एकाच चेहऱ्याचे दोन वेगवेगळे भाव, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - व्‍यक्‍तीच्‍या चेहऱ्यावरून त्‍याच्‍या मनात काय आहे, हे ओळखता येते. असेच भाव मुंबईचे छायाचित्रकार जय वेनस्टेन यांनी टिपले. त्‍यासाठी जय यांनी वेगवेगळ्या शहरांत जाऊन फोटो काढले.
दाखवले एकाच चेहऱ्याचे वेगवेगळे भाव...
> जय यांनी या फोटो मालिकेतून एकाच चेहऱ्याचे वेगवेगळे भाव दाखवले.
> त्‍यांनी या फोटो मालिकेला "So I asked them to smile" नाव दिले.
> डिसेंबर 2013 मध्‍ये बिकानेर ट्रिपच्‍या काळात जय यांना भेटलेल्‍या एका व्‍यक्‍तीचा चेहरा खूप भीतीदाखक वाटला.
> जय यांनी त्‍याच्‍या जवळ जात म्‍हटले, ''भाऊ थोडे हसा''. त्‍यानंतर त्‍या व्‍यक्‍तीने मंद हास्‍य केले. तो सुंदर दिसायला लागला.
> यातूनच त्‍यांना ही कल्‍पना सूचली.
> हा प्रोजेक्ट पूर्ण करण्‍यासाठी जय यांना पूर्ण तीन वर्षे लागलेत.

अभिनेता व्‍हायचे होते
> ऑस्ट्रेलियामध्‍ये जन्‍मलेले जय अनेक वर्षांपासून मुंबईत राहतात.
> जय यांचे आई वडील जेव्‍हा भारतात आले होते तेव्‍हा जय केवळ तीन वर्षांचे होते.
> जय यांना लहानपणापासूनच बॉलिवूडमध्‍ये नट होण्‍याची इच्‍छा होती.
> त्‍यातूनच ते मुंबईत आले.
> त्‍यांनी काही टीव्‍ही मालिका आणि जाहिरातीमध्‍ये भूमिकासुद्धा केल्‍या आहेत.
> याच काळात त्‍यांना छायाचित्रणाचा छंद जडला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जय यांनी घेतलेले फोटोज....
बातम्या आणखी आहेत...