आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची थोरली कन्या; पाहा डॉनच्या फॅमिलीचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदच्‍या मुली आणि मुलगा मोईन - Divya Marathi
दाऊदच्‍या मुली आणि मुलगा मोईन
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तीमध्ये त्याच्या वॉरविकशायर येथील हॉटेल आणि आलिशान बंगल्यांचाही समावेश आहे. भारतीय चलनात दाऊदची तेथील संपत्ती 4 हजार कोटींच्या घरात मानली जात आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला डॉनच्या फॅमिलीची माहिती घेऊन आलो आहे. डॉनची मोठी मुलगी सध्या काय करते, याविषयी माहिती या पॅकेजमध्ये आम्ही आपल्याला देणार आहोत.

पूर्वी याचवर्षी संयुक्‍त अरब अमिरातीतील दाऊद इब्राहीमची संपत्‍ती जप्‍त करण्यात आली होती. दाऊदने याआधीच आपल्‍या संपत्‍तीचा मोठा हिस्‍सा मुलगी माहरुख हिच्‍या नावावर केला आहे. एका प्रसिद्ध पाकिस्‍तानी क्रिकेटरच्‍या मुलासोबत तिचा विवाह झाला आहे.

दाऊदची संपत्‍ती आणि माहरुख
- माहरुख ही दाऊदची मोठी मुलगी आहे. तिचा विवाह पूर्व पाकिस्‍तानी क्रिकेटर जावेद मियांदादचा मुलगा जुनेदसोबत झाला आहे.
- त्‍यांचा विवाह मक्‍केतील एका मशिदमध्‍ये झाला होता. त्‍यानंतर दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्‍ये या विवाहाची शानदार पार्टी झाली होती.
- असे म्‍हटले जाते की, यूएई आणि अफ्रिका खंडातील आपल्‍या संपत्‍तीमधील मोठा हिस्‍सा दाऊदने माहरुख आणि त्‍याचा जावई जुनेदच्‍या नावावर केला आहे.
- याव्‍यतिरिक्‍त डॉल्फिन कन्‍स्ट्रक्शन, ईस्ट-वेस्ट एअरलायन्‍स, किंग व्हिडिओ आणि मोइन गार्मेन्‍ट या कंपन्‍याही त्‍यांच्‍या नावावर आहे.
- या कंपन्‍या दाऊद इब्राहीमच्‍या नातेवाइकांच्‍या नावावर असल्‍या तरी त्‍यांचा मुख्‍य कारभार डी-कंपनीचे सदस्‍यच सांभाळतात.
- माध्‍यमांच्‍या सुत्रांनुसार फिरोज नावाचा व्‍यक्ति दाऊदच्‍या कंपन्‍यांचे कामकाज पाहतो.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा दाऊद ईब्राहिमच्‍या कुटुंबीयांंबद्दल माहिती आणि पाहा, दाऊदची मोठी मुलगी माहरुख हिचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...