आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Physical Contact Doesn't Mean Rape In The Case Of Love, High Court Judgement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमप्रकरणात आलेला शरीरसंबंध बलात्कार नव्हे, उच्च न्यायालयाचा निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एखादे प्रेमप्रकरण भंगले आणि या काळात दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले असतील तर तो बलात्कार ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. या प्रकरणात आरोपी असलेल्या युवकाला सुनावण्यात आलेली सात वर्षांची शिक्षा माफ करून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. महेश कोटियन यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. महेशवर प्रेयसीने बलात्काराचा आरोप केला होता.


महेशने प्रेयसीला विवाहाचा प्रस्ताव दिला होता. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांत संबंध आले. तेव्हा तरुणीने विरोध केला नाही किंवा जबरदस्ती होत असल्याबद्दल आरडोओरडही केला नाही. त्यामुळे हा बलात्कार ठरत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. महेश याच्याशी असलेले प्रेमसंबंधही तरुणीने मान्य केले आहेत. मात्र, तो विवाहित असून त्याला एक मुलगा असल्याचे समजल्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. आपल्याबद्दल खोटी माहिती दिल्याप्रकरणी न्यायालयाने महेशला दोषी ठरवले; परंतु यापूर्वीच त्याने तीन वर्षे तुरुंगवास भोगला असल्याने त्याची मुक्तता करण्यात आली.