आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन सूर्यवंशी प्रकरण : सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान भवनाच्या आवारात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकारात आमदार राम कदम व क्षितिज ठाकूर यांच्याशिवाय आणखी कुणी आमदार होते का, याची तपासणी करून संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.

सूर्यवंशी मारहाण प्रकरणाची चौकशी पोलिस महासंचालक अथवा स्वतंत्र तपासयंत्रणेमार्फत व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केली होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी याचसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हाच निर्णय दिला होता. त्यावेळी दिलेला निर्णय पाटील यांच्या याचिकेवरील सुनावणीतही कायम ठेवत त्यांची याचिका निकाली काढली.