आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत किसिंग पोस्टरचा पूर, कुणी लावले कुणालाच माहिती नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रांदा परिसरात लावलेले पोस्‍टर्स. - Divya Marathi
ब्रांदा परिसरात लावलेले पोस्‍टर्स.
मुंबई - बांद्रा परिसरातील भिंतीवर ठिकठिकाणी कुणीतरी तीन प्रकारचे अश्लिल पोस्‍टर्स चिटकवलेत. या पोस्‍टर्समध्‍ये विदेशी कपल किस करताना दिसत आहेत. त्‍यामुळे नागरिक वैतागून गेले असून, जिगजॅग रोड, टर्नर रोड, पाली हिल, पाली मार्केट या ठिकाणी हे पोस्‍टर्स चिटकलेले आहेत. ते कुणी चिटकवले याचा तपास सुरू आहे.
नागरिकांनी केला विरोध
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्‍या वृत्‍तानुसार, मुश्ताक मोथा नावाच्‍या डॉक्टरने म्‍हटले , '' ही आपली संस्‍कृती नाही. हा प्रकार पाहून मी आवक्‍ झालो. ज्‍याने कुणी हे पोस्‍टर्स चिटकवले आहेत, त्‍याला शिक्षा मिळालीच पाहिजे’’ , अशी मागणी त्‍यांनी केली. पार्वती ओमकारा नावाच्‍या महिलेने म्‍हटले, '' मागील रविवारीपासून हे फोटो दिसत आहेत. लोक केवळ बघ्‍याची भूमिका घेत आहेत. त्‍यांना काढण्‍यासाठी प्रयत्‍न केले जात नाहीत. ते खूप अश्लिल असल्‍याने मुलींना त्‍या ठिकाणहून जाणे म्‍हणजे अवघडल्‍या वाटत आहे.
काहींनी केले समर्थन
कॉलेज स्टूडेंट मार्था फर्नांडीज म्‍हणाला, ''या फोटोमध्‍ये काहीही अश्‍लिल नाही. किस करणे हे प्रेमाचे प्रतीक आहे. सिनेमात सर्व जण किस करतानाच पाहताच ना. मग याला विरोध कशाला, ’’ , असा प्रश्‍न त्‍याने उपस्थित केला. एमबीएचा विद्यार्थी असलेला शान खान याने तर हे फोटो चिटकवणा-याचे कौतुक केले.
अधिकारी काय म्‍हणाले?
महापालिकेचे उपायुक्‍त रामदास म्‍हणाले, हा प्रकार ज्‍याने कुणी केला असेल त्‍याच्‍यावर कारवाई केली जाईल. आमच्‍या कर्मचा-यांना सांगून ते काढण्‍यात येतील.
आर्ट ग्रुपचे काम?
एका वेबसाइटाने केलेल्‍या दाव्‍यानुसार, लिमिट्स विदिन नावाच्‍या आर्ट ग्रुपचे हे काम आहे. काय करणे चूक आहे आणि काय करणे बरोबर, याची चर्चा घडवून आणणे हे ग्रुपचे काम आहे, असे वेबसाइटने म्‍हटले.
पुढील स्‍लाइडवर पाहा – संबंधित फोटो....