आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्याविरोधातील याचिका मागे घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्याविराेधात दाखल बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची याचिका लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लवकरच मागे घेणार आहे. या प्रकरणी कोणतेही पुरावे न मिळाल्याने काही दिवसांपूर्वीच ‘एसीबी’ने गावित यांना क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातील याचिकाही मागे घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्ते विष्णू म्हास्ले यांनी एसीबीला पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी ठेवली आहे. गावित यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमवली असल्याच्या अनेक तक्रारी २००९ ते २०१२ या काळात करण्यात आल्या होत्या. यावरून एसीबीला गावितांची खुली चौकशी करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. मात्र, या चौकशीत एसबीला कोणतेही गैरव्यवहार आढळून आले नाही.

गावित हे आदिवासी समाजातील माेठे नेते मानले जातात. लाेकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या कन्या डाॅ. हिना यांना भाजपात प्रवेश करून नंदूरबार लाेकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.
बातम्या आणखी आहेत...