आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PIL Filed In Bombay High Court Against Sharad Pawar\'s \'ink\' Remark

पवारांच्या दोनदा मतदान करण्याच्या वक्तव्याविरोधात याचिका, उद्या सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गेल्या पंधरवड्यात शाई पुसा व दोनदा मतदान करा, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेले होते. आयोगाने पवारांना तंबी देऊन असे वक्तव्य तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला शोभत नाही. पुन्हा अशी चूक करू नका, असे म्हटले होते. पवारांनी त्यावर दिलगिरी व्यक्त करीत पडदा टाकण्याची विनंती केली होती. आयोगाने मान्य करीत त्यावर पडदा पडला असतानाच आता एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने पवारांच्या या वक्तव्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर उद्या (गुरुवारी) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत हायकोर्ट काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांनी नवी मुंबई जवळ एका माथाडी कामगार मेळाव्यात दोनदा मतदान करण्याचा व शाई पुसण्याचा अजब सल्ला दिला होता. साता-यात 17 एप्रिल रोजी व पुन्हा मुंबईत येऊन 24 तारखेला घड्याळ्यावर शिक्का हाणा. पण मतदान करताना शाई लगेच पुसा नाहीतर घोळ होईल असे पवारांनी म्हटले होते. मात्र, हे वक्तव्य आपण विनोदाने केले होते. ही राजकीय सभा व प्रचारसभा नव्हती. तो एक पक्षाचा मेळावा होता. तसेच दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिलेला नाही अशी भूमिका पवारांनी नंतर मांडली होती.
विरोधकांनी यावर निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. आयोगाने पवारांना नोटिस बजावून उत्तर देण्यास सांगितले होते. त्यावर पवारांनी आयोगाकडे दिलगिरी व्यक्त हे प्रकरणावर पडदा पडावा अशी विनंती केली होती.