आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PIL Submited In Mumbai High Court Against BJP Government

विश्वास प्रस्तावप्रकरणी फडणवीस सरकारविरुद्ध दोन जनहित याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२८ नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टात सुनावणी
मुंबई- महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. त्यात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करवून घेण्यासाठी फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि राजकुमार अवस्थी यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा दोन्ही याचिकांवर २८ नोव्हेंबरला सुनावणी करतील.

तिरोडकर यांनी याचिकेत म्हटले आहे की, २८८ सदस्यांच्या विधानसभेत भाजपकडे फक्त १२३ आमदार आहेत. तरीही बागडे यांनी आवाजी मतदानाने विश्वास प्रस्ताव मंजूर करवून घेतला. हे फसवणुकीचे प्रकरण आहे. अवस्थी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, नियमांनुसार विधानसभेच्या एखाद्या सदस्यानेही मतदानाची मागणी केली तर मतदान घेणे अनिवार्य आहे, पण विधानसभा अध्यक्षांनी या नियमाचे पालन केले नाही.
यापूर्वी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती, पण उच्च न्यायालयाने ही याचिका खारिज केली होती.