आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pilgrimage Development Planning Work Finish Within A Year Cm Chavan

राज्यातील तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे वर्षाच्या आत पूर्ण करा- मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिख समितीची बैठक झाली.)
मुंबई- राज्यातील श्री क्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूर, अमरावती जिल्ह्यातील मोझरी आणि शेगाव येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामे जून 2015 पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य़मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर तीर्थतक्षेत्र विकास आराखडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री क्षेत्र मोझरी तीर्थविकास आराखडा आणि शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिख समितीची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ), पर्यावरण मंत्री संजय देवतळे, आमदार यशोमती ठाकुर, डॉ. संजय कुटे आदी यावेळी उपस्थित होते.
देहू आळंदी, पंढरपूर भंडारा डोंगर या तिर्थक्षेत्र विकासांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यातील मंजूर आराखड्यातील कामांच्या वाढीव किंमतीला मंजुरी देण्यात आली. या कामांमध्ये खासगी क्षेत्राचा जो सहभाग होता त्या ऐवजी शासकीय यंत्रणांच्या मार्फत ही कामे केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर येथील विकास कामांच्या नविन आराखड्यास देखील मंजुरी देण्यात आली. पंढरपुरमध्ये भूसंपादनासठी 164 कोटी रुपये, विकास कामांसाठी 77 कोटी रुपये तर अन्य प्रशासकीय कामांसाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस यावेळी मंजुरी देण्यात आली. या नव्या कामांमध्ये पालखी मार्गाच्या विकासाच्या कामाचा समावेश आहे. ह्या कामांसाठी लागणारी जमीन तातडीने संपादीत करून पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मोझरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम जून 2015 पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर नविन कामांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्याच्या देखील सूचना संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शेगाव तीर्थक्षेत्राचा सुधारीत विकास आराखडा 496 कोटी रुपयांचा झाला असून त्याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही सर्व पहिल्या टप्प्यातील कामे वर्षभरात पूर्ण करावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ. क्षत्रपती शिवाजी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.ए. संधू, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अमरावती विभागीय आयुक्त बनसोड आदींसह वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.