आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मेट्रो-7 चे बांधकाम सुरू असताना पिलर कोसळला, 1 जण जखमी. मोठी दुर्घटना टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोरेगावमधील आरे मेट्रो स्टेशनवरील पिलर बांधण्यासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सळ्यांचा वजनदार सांगाडा कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.

हा लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळण्यापूर्वी येथून बेस्टची बस गेली होती. त्यानंतर अनेक कार आणि इतर गाड्याही निघून गेल्या. हा पिलर कोसळला तेव्हा बाजूचा रस्ता मोकळा होता. त्यामुळे केवळ सुदैवानेच मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व अशी मेट्रो-7 धावणार आहे. सध्या या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद, आरे, पठाण वाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अँड महिंद्रा, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओव्हरीपाडा आणि दहिसर पूर्व अशी स्थानके असणार आहेत. मेट्रो-7 या प्रकल्पाला अंदाजे 6 हजार 208 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...