आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हवाईसुंदरीच्या \'खासगी गप्पां\'मुळे विचलित झाले होते लक्ष\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवीदिल्ली - 33 हजार फूट उंचीवर दोन हवाईसुंदरीच्या हाती विमानाचे संचालन सोपविणारा आणि ऑटो पायलट मोड ऑफ करणार्‍या वैमा‍निक बी. के सोनी याने खळबळजनक खुलासा केला आहे. विमानातील दोन हवाईसुंदरीच्या खासगी गप्पांमुळे त्याचे लक्ष विचलित झाले होते, असे सोनी याने नागरी हवाई वाहतूक महासंचालकांच्या (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल ऐव्हिशन) चौकशीत सांगितले.

'दोन्ही हवाईसुंदरी कॉकपिटमध्ये बसून बॉलिवूड तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत गप्पांमध्ये रंगल्या होत्या. त्यामुळे माझे लक्ष विचलित झाले होते. त्यानंतर मी विमान ऑटो पायलट मोड ऑफ करून टाकले आणि विमानाचे संचालन दोघींच्या हातात दिले होते'

परंतु डीजीसीएने वैमानिकाच्या जबाबावर विश्वास न ठेवता कॉकपिटमध्ये बसलेल्या 'त्या' दोन्ही हवाईसुंदरींना बाहेर का पाठवले नाही? असा उलट प्रश्नही केला. वैमानिकावर विमानात असलेल्या 166 प्रवाशांच्या जीवनासोबत खेळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वैमानिक सोन‍ीला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... हवाईसुंदरींचा प्रताप..!