आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पाईपलाईन फुटली; तळमजल्यात बुडून एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील देवनार-गोवंडी भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने सोमवारी सकाळी एकाचा बुडून मृत्यू झाला. देवीसिंग हजारे (वय-60) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

देवनार-गोवंडीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सोमवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास फुटली. त्यामुळे गोवंडी भागातल्या संजीवनी सोसायटीत पाणी शिलले. पाण्याने तळमजला तुडूंब भरला. त्यात नऊ जण बुडाले होते. त्यांना तत्काळ बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी देवीसिंह हजारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमीची प्रकृती स्थीर आहे.