आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भिवंडीलगत चिंचवली-किरावलीदरम्यान असलेल्या 'तानसा'ची मुख्य जलवाहिनी फुटल्याने मुंबईकरांवर भर पावसाळ्यात पाणीकपातीचे संकट कोसळले आहे. महापालिकेने तात्काळ 15 टक्के पाणीकपात लागू केली आहे.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दुरुस्तीचे काम सुरु असेपर्यंत सदर फुटलेली जलवाहिनी बंद करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्‍यात आले आहे.

तानसा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा करण्‍यात येतो. परंतु जलवाहिनी फुटल्यामुळे उद्या (गुरुवारी) 50 टक्के पाणीकपात होण्याचीही शक्यता वर्तवली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)