आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआयला मारहाण; ठाकूर, कदमांवर ठपका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळ परिसरात वाहतूक पोलिस उपनिरीक्षकास मारहाण केल्याप्रकरणी चौकशी समितीने बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर व मनसेचे राम कदम या दोन आमदारांना जबाबदार धरले आहे. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे समितीने अहवाल सोपवला.

या प्रकरणी ठाकूर, कदम यांच्यासह प्रदीप जैस्वाल, राजन साळवी व जयकुमार रावत या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. मात्र आता चौकशी समितीने केवळ दोघांवरच ठपका ठेवल्याने उर्वरित तीन आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

सहायक वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना 19 मार्च 2013 रोजी मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी 20 मार्च रोजी संबंधित पाच आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित केले. त्यानंतर पोलिसांनी कदम आणि ठाकूर यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी सरकारने आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सातसदस्यीय समिती नेमली होती.