आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्णवेळ वीजपुरवठा देऊच - ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोळसा पुरवठा, पावसाने दिलेली ओढ तसेच आणखी काही कारणांमुळे देशात सध्या 65 हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती संच बंद आहेत. या प्रश्नांसह इतर समस्या सोडवल्यानंतर देशातील प्रत्येक घराला रास्त दरात पूर्णवेळ वीजपुरवठा देण्याचे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिले.

गोयल यांनी शनिवारी प्रदेश कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, कोळसा घोटाळय़ामुळे कोळशाच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला. इंधन पुरवठय़ाच्या विविध समस्यांमुळे सध्या देशात कोळशाचे 40 हजार मेगावॅटचे, तर वायूवर आधारित 25 हजार मेगावॅटचे वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनाबरोबर वीजवहन, ऊर्जा क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे यावर लक्ष दिल्यास देशात विजेचा तुटवडा जाणवणार नाही.

देशात प्रत्येक घराला दिवसाचे चोवीस तास वीज मिळावी, शेती व उद्योगांना गरजेनुसार वीज मिळावी, हे मोदी सरकारचे स्वप्न असल्याचेही ते म्हणाले.

पाच वर्षांत आम्ही डिझेल जनरेटर व इन्व्हर्टरपासून मुक्ती देऊ शकलो तर देशाला ती मोठी देणगी असेल. वीज समस्या सोडवण्याचे काम टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे ठरवले आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

(फोटो - ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल)