आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस जन्मठेप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदाऊं - उत्तरप्रदेशातील बदांऊ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकणी आरोपी अहबरन सिंग स्थानिक कोर्टाने आज (गुरुवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच सिंग यांला एक लाख वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अतिरिक्त जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश एस.एन.त्रिपाठी यांनी हा निर्णय दिला.

आरोपी सिंगला ठोठावण्यात आलेल्या दंडामधील 70 टक्के रक्कम ही पीडित मुलीस दिली जाईल, असेही कोर्टाने यावेळी स्पष्‍ट केले.

दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दिवसागणिक बलात्काराच्या घटना घडत आहे. याबाबतही कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...'पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न'