आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये अल्पवयीन पिझ्झा बॉयकडून तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पिझ्झा देण्यास आलेल्या एका अल्पवयीन मुलाने बावीसवर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना वरळी परिसरात बुधवारी रात्री घडली. सायंकाळी पीडित तरुणीने चोवीसन येथून पिझ्झाची आॅर्डर दिली. काही वेळानंतर मुलगा पिझ्झा घेऊन तरुणीच्या घरी पोहोचला. या वेळी ही मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकूने तिच्यावर हल्ला करत पळ काढला. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मदतीसाठी तिने अलार्म वाजवल्यानंतर शेजाºयांनी तिला रुग्णालयात हलवले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याला बालसुधारगृहात पाठवले.