आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नेते पी. के. अण्णा पाटील यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ स्वतंत्रसेनानी, नेते व सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील (वय 90) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पाटील यांच्यावर उद्या त्यांच्या शहादा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अण्णा पाटील यांनी सहकार क्षेत्रात मोठे काम केले. मागास असलेल्या भागातही त्यांनी सातपुडा सहकारी साखर कारखाना काढला. सूतगिरणी, शैक्षणिक संस्था आणि सहकारी बॅंकेच्या माध्यमातून त्यांनी गावागावातील शेतक-यांची आर्थिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. नंदूरबार जिल्ह्यातील शहाद्याचे त्यांनी राजकीय प्रतिनिधी म्हणून केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते माजी आमदार राहिले आहेत. त्याआधी काँग्रेसच्या काळात त्यांना मंत्रिपदही भूषविले होते. अण्णा पाटील हे गुजर समाजातील नेते होते तरीही त्यांनी आदिवासी भागात सेवा केली.
अण्णासाहेबांनी सातपुडा परिसरात क्रांती घडवली. त्यामुळे सातपुडा परिसर सुजलाम सुफलाम झाला. सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्यात शेकडो आदिवासी बांधवांना रोजगार मिळाला. अण्णासाहेबांनी सुरु केलेल्या विविध विद्याशाखांमध्ये शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. अण्णासाहेबांनी धुळे येथील जवाहर सुतगिरणीत शेकडो आदिवासी बांधवांना शेअर होल्डर बनविले. त्यांनी स्वत: परिसरातील शेतक-यांच्या हितासाठी सुतगिरणीची स्थापणा केली. याचाही फायदा आदिवासींना रोजगार मिळवून देण्यासाठी झाला.
अण्णासाहेब यांनी आदिवासी समाजात जागृती घडवून आणली. आदिवासी शेतक-यांनी विविध सिंचन पध्दतींचा अवलंब करुन बारमाही शेती करुन आपले जीवनमान उंचावले. कारखान्याच्या मदतीने ज्या गरीब शेतक-याकडे जमीन कसण्यासाठी दोन बैल नव्हते, आज त्यांच्याकडे आज ट्रॅक्टर आहे ज्याला कामाची हमी देखील कारखानाच देत आहे. त्यांची इच्छा होती की सातपुड्यातील द-या खो-यात व टेकड्यांवर राहणा-या आदिवासी बांधवांनी वस्ती करुन गावांत एकत्रितपणे राहिले पाहिजे जेणेंकरून त्यांना त्या सर्व भौतीक सुविधा उपलब्ध व्हाव्यात ज्या फक्त गावातच मिळू शकतात. अण्णासाहेबांना अनेक पुरस्कारांनी सम्मानित केलेले आहे. अण्णासाहेबांचा मदतीचा हात समाजातील तळागाळातील लोकांसाठी सदैव पुढे सरसावलेला असायचा.