आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2600 कोटींचे आहे हे जिनांचे घर; येथेच रचण्यात आला भारताचे तुकडे करण्याचा प्लॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज पाकिस्तानचा आझादीचा दिवस आहे. याचप्रसंगी तुम्हाला मुंबईतील प्रसिद्ध मोहम्मद अली जिना यांच्या मुंबईतील निवासस्थानाविषयी माहिती देणार आहोत.
असे म्हटले जाते की, याच ठिकाणाहून भारताचे तुकडे करण्याचा कट आखण्यात आला होता. सध्या जिना हाऊस पाडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याच बंगल्याची किंमत 2600 कोटी एवढी आहे.
 
जिना हाऊस काय आहे?
- जिना हाऊसची प्रमुख ओळख म्हणजे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे मुंबईतील निवासस्थान अशी आहे. मलबार हिलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अगदी समोर हा अडीच एकरावर हा भव्य बंगला आहे.
- 1936 मध्ये मोहम्मद अली जिना जेव्हा इंग्लंडहून कायद्याचं उच्चशिक्षण घेऊन भारतात परतले तेव्हा त्यांनी हा बंगला बांधला, असं बोललं जातं. जिना यांनी भारतात परतल्यानंतर मुस्लीम लीगचा कारभार सांभाळला आणि त्यानंतर हे घर बांधले.
- त्याकाळी हे घर बांधण्याचा खर्च जवळपास 2 लाख रूपये आला होता आणि घर संपूर्णपणे युरोपियन स्टाईलने बांधण्यात आलं होतं. त्याकरता इटालियन मार्बल आणि खास वॉलनटची लाकडंही मागवण्यात आली होती, असे बोलले जाते.
- मात्र भारताच्या फाळणीनंतर जिना पाकिस्तानात गेले आणि त्यांची मुलगी दिना वाडिया, ज्या भारतात राहतात त्यांनी या घराच्या कायदेशीर वारस असल्याचा दावा केला. मात्र अद्याप हा बंगला केंद्र सरकारच्या ताब्यात आहे.
- जिनांच्या जन्माआधी काही काळ त्यांचे वडील जिन्हाभाई पूंजा कराची इथे व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले, कराची तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये येत होती.
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...