आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक कॅरीबॅगवर पाडव्यानंतर बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात गुढीपाडव्यानंतर प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. मंगळवारी मंत्रालयातील बैठकीत कदम म्हणाले, प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, याबाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागवले आहेत. तसेच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. टप्प्याटप्प्याने राज्यातील मनपा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्लास्टिकवर बंदीबाबत सांगण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...