आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो, शॉर्ट्स ड्रेस नो प्‍लीज; मुंबईतील कॉलेजने घातली बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - शॉर्ट्स ड्रेसमुळे युवतींवर अत्‍याचार होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे मुलींच्‍या सुरक्षेचे कारण देत शहरातील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने शॉर्ट्स ड्रेस बंदी घातली आहे. दरम्‍यान, ही बंदी केवळ मुलींसाठीच लागू असून, कॉलेजमध्‍ये बाहेरच्या महाविद्यालयांमधून येणा-या मुलींना हा नियम लागू नाही. त्‍यामुळे विद्यार्थिंनीमधून रोष व्‍यक्‍त केला जात आहे.
नेमकी का घातली बंदी
सेंट झेव्हियर्स कॉलेज हे शहरातील प्रसिद्ध कॉलेज आहे. या ठिकाणी दरवर्षी मल्‍हार उत्‍सवाचे आयोजन केले जाते. त्‍यात इतरही कॉलेजचे मुलं-मुली भाग घेतात. यंदा १५ ऑगस्टपासून हा उत्‍सव सुरू झाला आहे. दरम्‍यान या उत्‍सवाच्‍या अनुषंगाने प्राचार्य अँजेले मेन्जिस यांनी सुरक्षेचे कारण देत विद्यार्थिनींच्या शॉर्ट्सवर निर्बंध घातले. मात्र, विद्यार्थिनींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.