आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद परांजपेंवर शिवसैनिक संतप्‍त, ठाण्‍यात जाळला पुतळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे हे राष्‍ट्रवादीच्या वाटेवर असून शुक्रवारी त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थितीही दिली. परांजपे यांनी जाहीर नाराजी व्‍यक्त करतानाच राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश करण्‍याचे संकेत दिले. यामुळे शिवसेनेत राजकीय भूकंप आला असून त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यात येणार आहे. याबाबत आज संध्याकाळी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. तर ठाण्‍यामध्‍ये संतप्‍त शिवसैनिकांनी परांजपे यांचा पुतळा जाळला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आनंद परांजचे यांच्‍या तसेच त्‍यांचे कार्यालय व निवासस्‍थानाच्‍या सुरक्षेतही वाढ करण्‍यात आली आहे.
आनंद परांजपेंवर शिवसेनेच्‍या इतर नेत्‍यांनीही कडाडून टीका केली. ठाण्‍यातील आमदार एकनाथ शिंदे यांनी परांजपेंवर पाठीत खंजीर खुपसल्‍याचा आरोप केला. आनंद परांजपे यांनी त्यांचे वडील प्रकाश परांजपे यांच्या पुण्याईमुळे शिवसेनेने दोनदा खासदारपद दिले. परंतु आनंद परांजपे हे विसरले आहेत, अशी टीकाही केली. तर खासदार संजय राऊत म्‍हणाले, शुक्रवारी त्यांनी ठाण्यात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती देऊन राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ही राजकीय अनैतिकता आहे. त्यामुळे परांजपे यांच्यावर कारवाई होणारच. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेनाप्रमुखांना आहे. ते संध्याकाळी निर्णय घेतील, असे ही राऊत यांनी सांगितले.
ठाणे- कल्याणमध्ये शिवसैनिक संतप्त
शिवसेना खासदार आनंद परांजपे यांना आपल्या पक्षाकडे खेचून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला शुक्रवारी मोठा धक्का दिल्यानंतर ठाणे-कल्याणमधील शिवसैनिक मोठ्याप्रमाणात संतप्त झाले आहेत. त्यामुळे परांजपे यांचे कार्यालय आणि घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
लाखो 'शिवसैनिक' हीच आमची संपत्ती -बाळासाहेब ठाकरे