आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत अडचणींमुळे मोदींना उद्धव ठाकरे यांची आठवण; यापुढे संपर्क राहण्याची दिली ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एरवी स्वबळाचे नारे देणाऱ्या भाजपला संसदेत अडचणीत सापडल्याने आता एनडीएतील घटक पक्षांची आठवण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून जुन्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या. निमित्त होते ते नागा उग्रवादी संघटनांशी झालेल्या कराराची माहिती देण्याचे. इतक्या दिवसांत मोठ्या जबाबदारीमुळे संपर्क साधता आला नाही. मात्र यापुढे असे होणार नाही. भाजप व शिवसेना हे नाते आणखी दृढ होईल, अशा आणाभाका मोदींनी फोनवरून दिल्याचे समजते.

मोदींनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फोन करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. मी बाळासाहेबांना खूप मानतो. ठाकरे कुटुंबीयांशी माझे जवळचे नाते राहिले आहे. शिवसेनेबरोबरचे संबंध पूर्वीसारखेच राहतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केल्याचे समजते.
उद्धव यांनीही मग हे नाते कायम ठेवा, असा मैत्रीचा सूर आळवला. मध्यंतरी वेगळे मोदी दिसत होते. आता पुन्हा पूर्वीचे मोदी गवसले. घटक पक्षांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली असेल; पण आजही शिवसेना मैत्रीपासून दूर झालेली नाही. आमचा शब्द पुढेही पाळू, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे कळते. केंद्रात व राज्यात भाजपबरोबर असूनही शिवसेनेला दिल्ली तसेच महाराष्ट्रात किंमत दि ली जात नाही. प्रत्युत्तरात शिवसेनेनेही भाजपला वेळोवेळी सुनावल्याने सामना रंगला होता. यामुळे उभय पक्षांत काहीस वितुष्टही आले होते.

संकटामुळेच आठवण : विनायक राऊत
संकटात सापडल्याने भाजपला शिवसेनेची आठवण झाली. संसद ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत किमान मित्रपक्ष तरी एक असावेत, असे मोदींना वाटत असल्याने त्यांनी आमच्या नेतृत्वाला फोन केला. अन्यथा इतक्या दिवसांत त्यांना का आठवण झाली नाही, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी आपले मत मांडले.

सेनेचे महत्व कळले : संजय राऊत
उशिरा का होईना भाजपला शिवसेनेचे महत्व कळले, हे काय कमी आहे. शिवसेना आपल्या तत्वांपासून कधीही ढळणार नाही. मोदींनी मैत्रीचा नव्याने हात पुढे केला आहे, आिण आम्ही मैत्रीला जागणारी माणसे आहोत, असे खासदार संजय राऊत म्हणाले.