आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीमुळे पंतप्रधानांचा चेहरा मुख्यमंत्र्यांनी जाहिरातींमधून कमी केला: दिग्विजयसिंग (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘नोटाबंदीचा  फटका बसल्यामुळे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी  महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचारात पक्षाचा मुख्य चेहरा म्हणून स्वत:चा चेहरा वापरला आहे. जाहिरातींमध्ये ८० टक्के फडणवीस दिसत असून २० टक्के मोदींचा चेहरा वापरला गेला आहे’, अशी टीका काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. नाेटाबंदीचा भाजपला देशभर माेठा फटका बसणार असल्याचेही ते म्हणाले.   

‘मुंबई महापालिकेत भाजप व शिवसेना एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहे. हे एकप्रकारचे नाटक असून महापालिकेतील पैशांच्या भागीदारीवरून त्यांचे खरे भांडण आहे. आपल्याला  शिवसेनेइतका वाटा मिळत नसल्यामुळे पारदर्शकतेचा आव आणून भाजपने वेगळी चूल मांडली आहे. भाजपला शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा इतका राग होता, तर दोन दशके त्यांच्याबरोबर  संसार कसा मांडला?’ असे दिग्विजयसिंग म्हणाले.  

शिवसेना हा खंडणीखोर पक्ष असल्याचे  मुख्यमंत्री  म्हणतात. मग, अशा खंडणीखोर पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यावाचून फडणवीस यांना कोणी अडवले आहे. पण तसे केल्यास राज्यातील सत्ता गडगडेल, अशी भीती त्यांना वाटते. दुसरीकडे शिवसेनाही फक्त पाठिंबा  काढून घेण्याची धमकी देते, पण तसे करताना दिसत नाही. हे सर्व प्रकार म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा  प्रकार आहे, याकडे दिग्विजयसिंग यांनी लक्ष वेधले.   
 
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची परिस्थिती चांगली नाही. नोटाबंदीमुळे देशभरात नोकऱ्यांची स्थिती नाजूक झाली असून २० लाख लोकांना रोजगार गमवावे लागले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दीड वर्षे लागणार आहे. नोटाबंदीमुळे चलनापेक्षा अधिक पैसा बँकांमध्ये गुंतवला गेला. विशेष म्हणजे हे करताना बनावट नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आणि आता त्या काळ्याच्या पांढऱ्या झाल्या. या बनावट नोटा कोणी जमा केल्या, हे ओळखणे कठीण झाले आहे, असे दिग्विजय म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...