आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Gives Bravery Award To Mumbai Boy, BMC Issues Showcause Notice

बालशौर्य पुरस्कार प्राप्त मोहित दळवीच्या घराला मनपाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवल्याबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या मुंबईच्या मोहित दळवी याच्या पालकांना महापालिकेने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम असलेले घर तातडीने रिकामे करण्यात यावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणाऱ्या मोहितने एप्रिल महिन्यात बाळगंगा तलावात बुडत असलेल्या एका १० वर्षीय मुलीचे प्राण वाचवले होते. या तलावात कृष्णा पाष्टे बुडत होती. ते पाहून २५ फूट खाेल तलावात उडी घेऊन माेहितने कृष्णाला वाचवले. मोहित सध्या महापालिकेच्या शाळेत आठवीत शिकत आहे. मोहितचे आई-वडील हयात नाहीत. तो आत्या डिंपल दळवी यांच्याकडे राहतो. शुक्रवारी महापालिकेने डी वाॅर्ड िवभागातील अनधिकृत इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत. ज्या १३ कुटुंबांना नोटिसा पाठवल्या त्यामध्ये दळवी यांचाही समावेश आहे. स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा अाणि मी नोटिसा िमळालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या मोहितच्या कुटुंबास नोटीस िमळणे दुर्दैवी आहे. सोमवारी वाॅर्ड अधिकाऱ्याची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती या िवभागाच्या नगरसेविका ज्योत्स्ना मेहता यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.