आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Government Planning To Run Goods Train From Mumbai To Europe

मुंबईहून थेट युरोपपर्यंत मालगाडी सुरू करण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईहून थेट युरोपात मालगाडी नेण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. याअंतर्गत उत्तर- दक्षिण कॉरिडॉरमध्ये (आयएनएसटीसी) पूर्णपणे रेल्वे नेटवर्क सुरू करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकार व तेथील रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात अाहे.

कॉरिडॉरअंतर्गत भारत सध्या मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराशी जोडलेला आहे. हा कॉरिडॉर रेल्वे मार्ग इराणच्या समुद्र किनाऱ्याच्या अब्बासपासून उत्तर इराणमध्ये कॅस्पियन समुद्र तटावरील अंजाली बेटापर्यंत आहे. तेथून हा रेल्वेमार्ग कॅस्पियन समुद्रातील अस्त्राखानपासून सेंटपीटर्सबर्गपर्यंत तयार करण्यात येणार आहे. भविष्यात ही योजना दक्षिण, पश्चिम आशिया, युरोप व मध्य आशियादरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र बनू शकते. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, अफगाणिस्तानचा दौरा केला होता. तसेच भारत आणि इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी यात येणारे अडथळे दूर करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली होती.

भारताने लाहाेरला इराणच्या पूर्व सीमेला रेल्वे ट्रॅकने जोडण्याच्या प्रस्तावाला गती देण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी तेहरानमध्ये झालेल्या एका बैठकीत भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. ‘भारत लाहाेरदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. भारताच्या मालगाड्यांना पाकिस्तानातून जाण्याची परवानगी दिल्यास इराणच्या अंजाली बेटापासून अजरबैजाम सीमेजवळील अस्तरापर्यंत रेल्वे नेटवर्क तयार होऊ शकते. असे झाले तर भारतातून थेट सेंटपीटर्सबर्ग दरम्यान थेट मालगाडी धावू शकेल,’ असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

> रेल्वे प्रशासनाने दिला ट्रॅक पाकिस्तानातून टाकण्याचा प्रस्ताव
>विदेशातील व्यापाराला नव्या मार्गाने गतीची अाशा