आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत \'एनडीए\' बैठक; नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2019 ची निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आज  एनडीएमधील सर्व घटक पक्षांची दिल्लीत बैठक घेण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर सर्वांनी विश्वास व्यक्त केला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. यावेळी  पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात २०१९ च्या लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याचा ठराव 'एनडीए'च्या सर्व घटक पक्षांनी मंजूर केला. 
 
दरम्यान, भाजपशी असलेले टोकाचे मतभेद तूर्त बाजूला ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंनी आपला फॅमिली फॉरेन टूर रद्द करून पंतप्रधानांचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे जवळपास मे 2014 नंतर तीन वर्षांनी उद्धव ठाकरे हे मोदी-शहांना  दिल्लीत भेटले.  याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे हे दिल्लीत येऊन गेले, मात्र तेव्हा ते राजनाथ सिंह, जेटली यांनाच भेटले. अमित शहा- उद्धव ठाकरे हे तर अगदी तीन वर्षांनी आमने-सामने असतील. निमित्त यूपीच्या विजयाचे असले, तरी चर्चा मात्र राष्ट्रपती निवडणुकीचीच झाल्याची माहिती आहे. 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उद्धव ठाकरेंना फोनवरून निमंत्रण दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजपत निर्माण झालेल्या तणावामुळे ठाकरे निमंत्रण स्वीकारतील का याबाबत शंका होत्या. त्यातच खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवल्याशिवाय शिवसेना स्नेहभोजनाला जाणार नसल्याचा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... उद्धव ठाकरे यांनी घेतला शिवसेना खासदारांचा वर्ग!

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...