आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Shiv Sena Member Has Been Given An Office In South Block, Where The Prime Minister\'s Office Is Located, And Is Expected To Be Given Cabinet Rank.

मोदींना केंद्रात हवेत अडगळीत पडलेले अभ्यासू सुरेश प्रभू, उद्धव यांची मात्र \'ना\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी किरकोळ बदलांसह विस्तार होत आहे. या विस्तारात 12 ते 15 मंत्री शपथ घेणार आहेत. या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. यात एक वजनदार कॅबिनेट व स्वतंत्र कारभाराचे राज्यमंत्रीपद आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाने व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सेनेकडे दोन संभाव्य मंत्र्यांची नावे मागितली आहेत. यावेळी भाजपने माजी केंद्रीय मंत्री व नदीजोड प्रकल्पावर भरीव कामगिरी करणा-या सुरेश प्रभूंसारख्या अभ्यासू नेत्याचा समावेश असावा अशी विनंती केली आहे. प्रभू देशासाठी भरीव योगदान देऊ शकतात त्यामुळे सेनेने त्यांना आपल्या कोट्यातून केंद्रात पाठवावे असे सांगितल्याचे कळते आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र प्रभू यांना केंद्रात पाठविण्यास उत्सुक नसल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
उद्धव यांनी आपले निकटवर्तीय अनिल देसाई यांना स्वतंत्र कारभाराचे राज्यमंत्रीपद द्यावे तर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ किंवा औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यापैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात असा विचार पक्षनेत्यांकडे मांडला आहे. असे असले तरी भाजपला व मोदींना मात्र प्रभू कोणत्याही स्थितीत हवे आहेत. शिवसेनेचे नेतृत्त्व मात्र त्यास तयार नाही. प्रभू सध्या लोकसभा अथवा राज्यसभेत नाहीत. मार्च 2016 पर्यंत त्यांना राज्यसभेवर पाठवणे शक्य नसल्याचे सांगत सेनेने मोदींची नाराज ओढावून न घेण्याची खेळी खेळली आहे. दरम्यान, प्रभूंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत पाठवून मंत्रीपद देता येईल काय याची चाचपणी केंद्रीय नेतृत्त्व करीत आहे. मनोहर पर्रिकर यांनाही राज्यसभेत घ्यावे लागणार आहे. कदाचित भाजप त्यांना यूपीतून राज्यसभेवर पाठवेल. मात्र, नजीकच्या काळात प्रभूंना संसदेत पाठवणे शक्य नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. भविष्यात मात्र प्रभूंचा विचार होऊ शकतो असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करीत विस्ताराबाबत कल्पना दिली. याचबरोबर सेनेच्या कोट्यातून किमान दोघांची नावे कळवा असे सांगितले. यावर उद्धव यांनी राज्यातील निर्णय काय असेल अशी विचारणा अमित शहांकडे केल्याचे कळते. यावर आधी केंद्रातील नावे शुक्रवार रात्रीपर्यंत कळवा. ती यादी राष्ट्रपतीकडे पाठवायची आहे असे सांगत राज्यातील सत्तेच्या वाट्याबाबत रविवारपर्यंत निर्णय घेऊ असे सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार उद्धव अनिल देसाई, खैरे व अडसूळ यांची नावे कळविणार आहेत. मात्र, प्रभूंच्या बाबतीत उद्धव ठाकरे बिलकूल विचार करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते.
सुरेश प्रभू केंद्रात मंत्री असताना शिवसेनेला ते जुमानत नव्हते. भाजप नेत्यांशीच त्यांची अधिक सलगी होती ही बाब उद्धव यांनी पसंत नाहीये. त्यामुळे प्रभूंच्या नावावर सेनेने फुली मारली आहे. याच सर्व बाबींमुळे कोकणातून लोकसभेला प्रभू अधिक सक्षम उमेदवार असतानाही उद्धव यांनी विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती. सुदैवाने राऊत विजयी झाले. प्रभू हे अभ्यासू व विकासात्मक राजकारण करणारे नेते आहेत. लांगनचालन करणे त्यांना जमत नाही व तशी त्यांची प्रकृती नाही. त्यामुळे सेनेतून ते बाहेर फेकले आहेत. मात्र, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना प्रभू देशासाठी कसे योगदान देऊ शकतात याची माहिती असल्याने अनेकांनी मोदींना आपल्या कॅबिनेटमध्ये प्रभूंना सामील करून घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, शिवसेनेने त्यांच्याविषयी आकसाची भूमिका घेतल्याने चांगल्या व अभ्यासू नेत्यावर अन्याय होत आहे. भाजप आता उद्धव यांच्या ना नंतर काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.
पुढे वाचा, कोण आहेत सुरेश प्रभू आणि मोदी यांना का ते हवे आहेत आपल्या मंत्रिमंडळात...