आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा पाहा छायाचित्रांच्या माध्यमातून...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांना भेट मिळालेल्या भेटवस्तूंच्या संग्राहलयाची पंतप्रधान मोदींना माहिती देताना पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे... - Divya Marathi
शरद पवारांना भेट मिळालेल्या भेटवस्तूंच्या संग्राहलयाची पंतप्रधान मोदींना माहिती देताना पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे...
(छायाचित्र- शरद पवारांना भेट मिळालेल्या भेटवस्तूंच्या संग्राहलयाची पंतप्रधान मोदींना माहिती देताना पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे)
बारामती- शरद पवार आणि माझे राजकारणातील मार्ग वेगळे आहेत. तरीही आमचे ध्येय मात्र एकच आहे ते म्हणजे देशाचा विकास. त्यामुळेच राजकीय विचार वेगळे असले तरी राष्ट्रनिती महत्त्वाची आहे. शरद पवार अनुभवी नेते आहेत. त्यांच्यात माझ्यात संवाद आहे. आमच्यात महिन्यातून दोन-तीनचा विचारमंथन होते. त्यांच्यासारख्या नेत्याचे मार्गदर्शन माझ्यासारख्याने जरूर घेतले पाहिजे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या दृरदूष्टीचे कौतुक केले.

पंतप्रधानांची बारामती भेट ही इथल्या कृषी, उद्योग, शिक्षण व तंत्रज्ञान या क्षेत्रातील शरद पवार यांच्या दीर्घदृष्टीचा आविष्कार जाणून घेण्याच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल. विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, जनवस्तू संग्रहालयाला भेट, आप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन, कृषी विज्ञान केंद्रातील प्रयोगशाळेला भेट, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी मेळाव्यातला सहभाग याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीतल्या कृषिऔद्योगिक व ज्ञानाधिष्ठित सर्वंकष विकासाचे प्रारूप समजून घेतले.
नरेंद्र मोदी यांनी बारामतीतील विविध विकासकामांना व प्रकल्पांना भेटी दिल्या. आम्ही तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामतीचा दौरा छायाचित्रांच्या माध्यामातून दाखविणार आहोत....
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, मोदींचा बारामतीचा दौरा...