आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार लोकांसमोर मांडा; नरेंद्र मोदींनी दिला कानमंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा भ्रष्टाचार घेऊन जनतेपर्यंत घेऊन जा, तुमचा विजय निश्चित होईल,’ असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील भाजपच्या निवडक पन्नास पदाधिकार्‍यांना दिला.

भाभा अणुसंशोधन केंद्राला भेट देण्यासाठी मुंबईत आलेल्या मोदींनी रात्री ग्रँड हयात या हॉटेलमध्ये भाजप पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. ‘तुम्ही उत्तम संघटक बना. एक संघटक कोठे पोहोचू शकतो, काय करू शकतो, याचे मी तुमच्यासमोर उदाहरण आहे,’ असे त्यांनी सांगितले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका कशा लढायचा याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल. त्यामध्ये केंद्रीय नेतृत्व विशेष ढवळाढवळ करणार नाही, असा खुलासाही मोदींनी केला.
पंतप्रधानांना भेटताना प्रोटोकॉल पाळावे लागतात. परंतु, मोदी यांनी प्रोटोकॉल मोडत भाजप पदाधिकार्‍यांना जवळ बोलावून घेतले आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत 20 मिनिटे गुजगोष्टी केल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते अतुल शहा यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.