आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारकाचे २४ डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अरबी समुुद्रात भूमिपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - होणार होणार म्हणून पुढे ढकलण्यात आलेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकदाची वेळ मिळाली आहे. २४ डिसेंबरला मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार अाहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तसा कार्यक्रम निश्चित झाल्याची माहिती प्रदेश भाजपमधील सूत्रांनी दिली.

आघाडी सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची घोषणा केली होती. मात्र केंद्राकडून मिळणाऱ्या परवानग्यांत स्मारकाचे काम पुढे जाऊ शकले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या परवानग्या मिळवल्या. त्यामुळे आता २४ डिसेंबर रोजी भूमिपूजनाचा मुहूर्त पक्का करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यादृष्टीने शिवस्मारकाचे २४ रोजी मोदींच्या हस्ते भूमिपूजन अरबी समुद्रात स्मारक उभारण्यात येत आहे. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर समुद्रात महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्राधान सचिव हे या समित्यांचे अध्यक्ष आहेत.युती सरकार २०१९ पर्यंत स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण करणार आहे. तसे झाल्यास विधानसभेच्या पुढच्या पंचवार्षीक निवडणुकीत शिवस्मारक युतीसाठी मोठीच उपलब्धी असणार आहे.
१६ एकरावर ३०९ फूट उंच स्मारक
स्मारकासाठी अरबी समुद्रात मरीन ड्राईव्हला समांतर १६ एकराचा खडक निवडला आहे. स्मारक सुमारे ३०९ फूट उंच असेल. खडकावर तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येईल. स्मारकास भेट देणाऱ्या पर्यटकांना महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान आदी सुविधा स्मारकात असणार आहेत.
अरबी समुद्राला २४ डिसेंबर रोजी मोठी भरती आहे. अडीच मीटर उंच लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना दाेन कि.मी. खोल समुद्रात कसे न्यायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. पीएमओ कार्यालयाने भूमीपूजन कार्यक्रमासाठी केवळ १० मिनीटांचा वेळ दिला आहे. एकंदर स्मारकाच्या भूमीपूजनाची तयारी अधिकाऱ्यांची मोठी परिक्षा असणार आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...