आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi Wishes To Cm Fadnavis On His Birthday

वाढदिवस साजरा न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन, मोदींच्या फडणवीसांना शुभेच्छा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला वाढदिवस साजरा न करता त्याची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. - Divya Marathi
आपला वाढदिवस साजरा न करता त्याची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
मुंबई- आपण कधीही वाढदिवस साजरा करीत नाही. आताही आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारे साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे. फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. मात्रे ते वाढदिवस कधीही साजरा करीत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज 22 जुलै मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. मात्र आपण वाढदिवस कधीही साजरा करीत नाही. मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे घेतल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस असला तरीही मुख्यमंत्री तो साजरा करणार नाहीत. हिंतचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करू नये व भेटवस्तू भेट देऊ नयेत. त्याऐवजी यासाठीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे आज दिवसभर विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील व सायंकाळी कुटुंबियांसमवेत वेळ घालवणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या या संदेशात मोदींनी फडणवीसांचा उल्लेख तरूण आणि मेहनती मुख्यमंत्री असा केला आहे. फडणवीस यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशाही शुभेच्छा मोदी यांनी दिल्या आहेत.
पुढे पाहा, पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना दिलेल्या शुभेच्छा...