आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शायर मुनव्वर राणांनी परत केला पुरस्‍कार, वाचा चेतन भगतांवरील जोरदार टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दादरी हत्‍या प्रकरणाविषयी नाराजी व्‍यक्‍त करत प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्‍वर राणा यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्‍याची घोषणा केली आहे. एका वृत्‍तवाहिनीच्‍या कार्यक्रमात त्‍यांनी ही घोषणा केली आहे. त्‍यामुळे पुरस्‍कार परत करणा-यांच्‍या यादीमध्‍ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

दादरी हत्‍या प्रकरण, देशात तयार झालेले धार्मिक तणावाचे वातावरण यामुळे साहित्‍यिक साहित्‍य अकादमी पुरस्‍कार सरकारला परत करत आहेत. या यादीत आणखी भर पडली. देशातील सद्याच्‍या परिस्‍थितीमुळे आपण नाराज असल्‍याचे सांगत राणा यांनीची पुरस्‍कार परत करण्‍याची घोषणा केली. पुरस्काराचे प्रमाणपत्र, मानचिन्‍ह आणि एक लाख रूपयांचा धनादेशही त्यांनी परत केला आहे. यापुढे आपण शासनाचा कुठलाही पुरस्‍कार स्‍विकारणार नाही, अशी घोषणाही त्‍यांनी केली आहे. या विचारावर आपण ठाम असून कोणताही पुनर्विचार करायचा नाही असेही त्‍यांनी सुचविले.
काय म्‍हणाले उर्दू शायर मुनव्वर राणा
या देशात अजून विजेच्‍या तारा जोडल्‍या नाहीत नि मुस्‍लीमांच्‍या संबंधांच्‍या तारा दाऊदसोबत जोडल्‍या जातात. साहित्‍यिकांना या नाहीतर त्‍या पक्षाशी जोडले जाते, कोणाला काँग्रेस, तर कोणाला भाजपचा लेखक म्हटले जात आहे. अशी खंत उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी व्‍यक्‍त केली. मी मुस्लीम आहे त्यामुळे माझे नातेही पाकिस्तानशी जोडले जाईल, अशी शक्‍यताही त्‍यांनी शेवटी व्‍यक्‍त केली.
चेतन भगत काय म्‍हणाले होते ?
- 8 ऑक्‍टोबरला चेतन भगत यांनी ट्विट करून पुरस्‍कार परत केलेल्‍या साहित्‍यकारांवर टीका केली होती. पुरस्‍कार परत करणारे साहित्‍यिक हे राजकारणाने प्रभावित आहेत, असे त्‍यांनी म्‍हटले होते. भगत असेही म्‍हणाले होते की, ''ज्‍यांना सरकार पसंत नाही ते आपला पासपोर्ट आणि विद्यापीठांनी दिलेल्‍या पदव्‍या का परत करत नाही ?'' भगत यांच्‍या या विधानाला नंतर अनेकांनी जोरदान उत्‍तर दिले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भगत यांना कोणी कसे दिले प्रत्‍युत्‍तर..